ADVERTISE

Wednesday 22 March 2023

  

ताडाचे झाड :(जीवनाचे झाड ) एक बहुगुणी झाड

  महारष्ट्रात प्रामुख्याने गडचिरोली जिल्हात आढळून येणारे ताडाचे झाड  निरा या पेयासाठी आणि ताडगोळा या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष आहे .माझ्या शेत मध्ये १५.१६ वृक्ष आहेत. ताडीच्या झाडांना कोणतीही मशागत करावी लागत नाही फक्त मुबलक पाणी आणि झाडांचे संगोपन करून शेताच्या बांधावर जरी झाडे लावली तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते,  नीरा हे पेय आमचं गावात खूपच प्रिय असून अलीकडे मात्र कुशल नीरा काढणारे वरिष्ठ मंडळींची कमतरता व नीरा काढण्यात रस कमी झाल्यामुळे स्थानिक मंडळी खूप कामी प्रमाणात दिसतात .त्यामुळे तेलंगाना व आंध्र प्रदेश येतून येणारी अतिशाल कुशल मंडळी असतात.तीन -चार महिन्यात लाखो रुपये कमी करून जात असतात तसेच प्रमाना पेक्षा जास्त नीरा कडून चटणी केल्यामुळे बरीच वृक्ष  नामशेष झाली आहेत .नामशेष झालेले ही झाडे शासनाने लावण्यासाठी प्रयत्न करावेत. वनविभाच्या नर्सरीमध्ये ही झाडे वाढवून गरजू शेतकऱ्यांना दिली तर त्यातून शासनाचा महसून वाढेल आणि नीरा व्यवसायाला चालना मिळू शकते. त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो,.आमच्या गावात पाव म्हणजेच २५० मी .ली . नीरा २०/- रुपये या प्रमाणे विकल्या जाते. सध्या डुप्लिकेट ताडीच जास्त मिळते. ही ताडी विशिष्ठ प्रकारच्या गोळ्या पाण्यात टाकुन बनवतात. गोळ्यांचे प्रमाण जास्त झाल्यास जिवीत हानी होते. त्यामुळे कोणाला ताडी पिण्याची लहर आल्यास सरळ ताडीच्या बगिच्यात जावे. ताडीच्या दुकानात भेसळीची ताडी असण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच शुध्द निराही सध्या दुर्लभच झालीय.  या भागात या वृक्षा  विषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सर्व प्रथम खालील माहिती बघू.

वनस्पतीशास्त्रतील माहिती

 Taxonomy

Kingdom

Plantae

Phylum

Tracheophyta

Class

Liliopsida

Order

Arecales

Family

Arecaceae

Genus

Borassus

Species

Borassus flabellifer L.

               ग्रीक शास्त्रज्ञ हीरॉडोटस (ख्रि. पू. सु. ४२०) यांना ताडीची माहिती होती.ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुलातील आहेत. ताड हा दूरवरून नारळासारखा दिसतो. तो मूळचा दक्षिण आशियातील असून इंडोनेशिया ते पाकिस्तान या देशांत आढळतो. मूलतः तो आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी), श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आहे. तो भारताच्या मैदानी प्रदेशात, उत्तर प्रदेशात, दक्षिण भारतात सहज बी पडून आलेला किंवा मुद्दाम लागवड केल्यामुळे वाढलेला आढळतो; महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी पडीत जमीनीवर त्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचे जंगल बनले आहे भारतात पं. बंगाल व बिहार या राज्यांत ताड मोठ्या प्रमाणात असून इतर राज्यांतही तो आढळतो. महाराष्ट्र राज्यात ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत ताडाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात त्याला ताडगोळा वृक्ष असेही म्हणतात.

ताड हा वृक्ष सु. ३० मी. उंच वाढतो.

               खोडाचा घेर तळाशी सु. २ मी. असून ते राखाडी व दंडगोलाकार असते. खोड मध्यभागी किंचित फुगीर असते. खोडाच्या जमिनीलगत असलेली अनेक फुगीर मुळे खोडाला घट्ट धरून ठेवतात. खोड लहानपणी वाळलेल्या पानांनी आच्छादलेले असते, तर मोठेपणी त्यावर पडून गेलेल्या पानांचे वण (किण) दिसतात. सुरुवातीला ताडाची वाढ सावकाश होते, तर वय झाल्यावर ते भरभर वाढते.

               खोडाच्या टोकाला ३० ते ४० पानांचा झुबका असतो. पाने एकाआड एक, विभाजित व पंख्याच्या आकाराची असून पाते अर्धवर्तुळाकार, १-१.५ मी. रुंद, चिवट, चकचकीत व थोडेसे विभागलेले असते. पानांचे देठ लांब, दणकट, ६-१२ सेंमी. लांब असून त्यांच्या कडांवर काटे असतात. पानांची कळी उमलण्यापूर्वी पात्यास चुण्या पडून ते कळीत सामावलेले असते. फुलोरे दोन प्रकारांचे असून ते दोन वेगवेगळ्या झाडांवर येतात. त्यांना स्थूलकणिश म्हणतात. कणिश मोठे व शाखित असून अनेक छदांनी वेढलेले असते. त्यावर लहान, गुलाबी किंवा पिवळी व असंख्य नरफुले असतात. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर तसेच हलक्या जमिनीत ताडीची झाडे चांगल्या प्रकारे येतात. या झाडांना चांगल्या प्रतीच्या जमिनीची देखील गरज नसल्यामुळेकुठल्याही पडीक जागी याची लागवड करता येते. बरेचसे पक्षी निरनिराळ्या फायकसच्या फळांच्या जातीवर (वडपिंपळ, इत्यादी) उदरभरण करतात. हे पक्षी जेव्हा ताड वृक्षावर बसतात तेव्हा त्यांच्या विष्ठेतून पडलेल्या या बिया पावसाळ्यात कधी पानाच्या खाचीत रुजतात तर कधी खोडाच्या निरनिराळ्या भागात अडकून रुजू लागतात. अशी रुजलेली ही उंबर-वडाच्या जातीची झाडे ताडाच्या खाचीत त्याच्या खडबडीत खोडावर वाढू लागतात. हळूहळू ही रोपे आपली आगंतुक हवेत वाढणारी मुळे हळूच जमिनीकडे पाठवतात. ही मुळे एकदा क जमिनीपर्यंत पोहोचली कि झाडे जोमाने वाढू लागतात. मुळांना फाटे फुटून ती ताडाच्या चारही बाजूंनी पसरतात व ताडला संपूर्ण कवेत घेतात. हळूहळू या वाढणाऱ्या मूळांचा दाब या ताडाच्या खोडावर वाढू लागतो. जोपर्यंत ताड वाढत असतो आणि त्याच्या स्वतःच्या वाढीचा जोम कायम असतो, तोपर्यंत त्यावर वड-उंबराच्या झाडांचा काहीही परिणाम होत नाही. पण जेव्हा ताडाचे वय होऊ लागते व त्याचे आयुष्य नैसर्गिक रीतीने संपुष्टात येण्याच्या जवळ येऊ लागते तसा वडाच्या झाडाचा जोर वाढू लागतो आणि तो ताडाला चिरडू लागतो. अशा वृक्षांना स्ट्रॅंगलिंग फायकम असे म्हणतात.

               मादीफुले मोठी, हिरवी आणि अनेक शाखीय स्थूलकणिशावर येतात. फळ आठळीयुक्त, मोठे, गोल, करड्या व पिवळ्या रंगाचे असून त्यांत एक ते तीन बिया असतात. भ्रूणपोष पांढरा व मऊ असून मध्ये पोकळी असते. कच्च्या बियांना ताडगोळे म्हणतात. त्यातील भ्रूणपोष लोक आवडीने खातात. त्यापासून थंडावा मिळतो. ताड महत्त्वाचा आणि उपयुक्त वृक्ष आहे. त्यापासून शर्करायुक्त रस जमा करतात. त्याला शुगर पाम असेही म्हणतात. फुलोरे छदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून बाहेर पडणारा गोड रस मडक्यात जमा करतात. या ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात. नीरा काही काळ आंबल्यानंतर त्याची ताडी बनते. ताडी एक मादक पेय आहे. ताजा रस (नीरा) उकळून त्यापासून गूळ आणि इतर गोड पदार्थ बनवितात. ताडीच्या ऊर्ध्व पातनापासून मिळविलेल्या दारूस ‘अर्राक’ म्हणतात. ताडीपासून कमी प्रतीचा व्हिनेगर (शिर्का) तयार करतात.

ताडाचे खोड खांब, वासे व फळ्या बनविण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी मऊ खोड पोखरून व नळीसारखे करून पाणी वाहून नेण्यासाठी वापरतात. पाने व खोडापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग झाडू, कुंचले, दोर, पायपोस बनविण्यासाठी करतात. ताडगोळे शामक व पौष्टिक असतात. नीरा उत्तेजक, थंड, मूत्रल आणि ‘क’जीवनसत्त्वयुक्त पेय म्हणून प्रसिद्ध आहे.

 

नीराबाबत थोडी माहिती.........

               ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहे.. ताडाच्या झाडास माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर, त्यातुन निघणारा रस. हा रस त्या केलेल्या खाचेखाली मडके बांधून त्यात गोळा करतात. हा रस प्रकृतीने थंड असतो. सूर्योदय झाल्यावर हा आंबतो. त्यापूर्वीच हा पिणे श्रेयस्कर असते. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते.उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही.  महाराष्ट्र शासनाची या पेयास 'नीरा' म्हणून मान्यता आहे. शहरांमधून रस्त्यारस्त्यावर नीरा विकणारी अनेक केंद्रे असतात. नीरेमध्ये १२ टक्के साखर असते.

ताडीपासून गूळ व साखरही बनते. ताडी आंबल्यावर पहिल्या ३ ते ८ तासात तिच्यात ३ टक्के एथिल अल्कोहोल बनते. ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल ५ टक्क्यापर्यंत वाढते. त्याहून अधिक झाल्यास ताडी माणसाने पिण्याच्या लायकीची रहात नाही.

 अस म्हणतात ताडीचे दोन प्रकारचे झाड असतात, आणी दिवसातुन तिन वेळा (सकाळ, दुपार व संध्याकाळ) ताडी काढल्या जाते.
१) नर झाडः नर झाडची ताडी गोड असते, हि ताडी सहकुटुंब पिता येते, थोडिशी नशा येते, सकाळचे ताडी असेल तर नशा मुळीच येत नाही.
२) मादी झाड: मादी झाडाची ताडी आंबट असते, हि ताडी फक्त पुरुष पितात. याने नशा तर येतेच, पण पुरुषाची ताकद वैगरे वाढते असं म्हणतात. ताडी  सामन्यात : नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मिळते. एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये झाडाला ताडी येत नाही.
ताडीच्या झाडाला रात्री मडके अडकवून त्याला कोयत्याने खापे मारतात. त्यातून  थेंब थेंब गोड रस पाझरतो. त्या गोड रसास नीरा म्हनतात. ती मडक्यातून काढून हल्ली मार्केतिंगची व्यवस्था झाल्याने व प्रचार झाल्याने विकतात. ती मधुर असते. मात्र हा गोड रस जसजसे उन वाढत जाते तसे उष्नतेने आम्बू लागतो व दुधाळ रंगाची ताडी तयार होते. हे मात्र मादक पेय आहे. अर्थात हातभट्टी वगैरे इतके नाही.स्वस्तही असते. जो द्रव नीरा म्हणून विकला जातो त्याचे तपमान वाढू नये म्हणून भांडे बर्फात ठेवतात. थन्डगार नीरा अतिशय मधुर असते . जिथे त्वरित मार्केट उपलब्ध नाही तिथे ताडी बनवून विकली जाते. त्यामुळे नीरा आरोग्य दायी आहे ताडी मद्य आहे....

मुंजारु (रं) : एप्रिल महिन्यापासुन याच गोल्याना गोल नारळासारखं फळं येतात, त्याला मुंजारु म्हणतात. मे-जुन मध्ये हे मुंजारु पुर्ण पणे पाण्यानी भरतं, मग आम्ही ती मुंजारं नारळाचं शहाळं जस पितात अगदी तसं पितो व आत मधिल मलाई तर फारच गोड व चवदार असते.

पण जुन नंतर मुंजारातील आतलं पाणी नाहीस होतं व मुंजारं पिकायला लागतात. जुलै-ऑगस्ट मध्ये ही मुंजार पिकुन पडतात, मग आम्हि ती पिकून पडलेली मुंजारं शेकोटिवर भाजुन खातो. परत सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ताडगोले विकसित होण्याची प्रक्रिया सुरु होते

गोले: ताडीच्या झाडाना दोन तिन फुट लांबीचे गोले येतात. साधरणत: नोव्हेंबर महिन्यात हे गोले ताडी नावाच्या द्रवानी भरतात. या गोल्याच्या टोकाला खुप धारधार विळीनी अगदी बारीक काप निघेल असे कापावे लागते. एकदा असे कापले की साधरन पुढचे पाच तास थेंब थेंब ताडी येते. आम्ही गावाला बांबूचे गोट्टाल (मराठीत काय म्हणतात माहीत नाही) किंवा खेडयात पिण्याच्या पाण्यासाठी दुधी असते ना, ती दुधी त्या ताड गोल्याना अशा प्रकारे बांधतो की गोल्यातुन पडणारे थेंब बरोबर त्या दुधित किंवा गोट्ट्यात पडते. पण पाच तासानंतर त्या गोल्याच्या टोकावर चिकट थर साचतो व हळु हळू थेंबं पडणे बंद होते. म्हणुन दर पाच सहा तासानी झाडावर चढून भरलेले गोट्टाल काढावे लागते आणी गोल्याच्या टोकाचा बारिक  काप कापावा लागतो. एकदा काप कापले कि परत ताडीचे थेंबं जोरात पडायला सुरुवात होते. नर झाडाला एक वेळी ८-१० गोले असतात. २५-३० दिवसात काप कापुन कापुन हे गोले संपतात, पण त्याच वेळेला नविन गोले तयार होत असतात. हे प्रक्रिया मार्च पर्यंत चालते. मादी झाडाला तुलनेने दुप्पट गोले येतात.

औषधी गुणधर्म

               नीरा ही आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत गुणकारी आहे. पहाटेच्या प्रहरी नीरा प्यायल्याने पोटातील अनेक विकार कमी होतात. किडनी स्टोनसाठी तर नीरा अत्यंत गुनकारी मानली जाते. खरं तर प्रत्येक डॉक्टर रुग्णांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात त्यापेक्षा ही 10 पट अधिकचे न्यूट्रिशन नीरा मधून मिळत असतेनारळाप्रमाणे ताडही महत्त्वाचा व उपयुक्त वृक्ष आहे. त्यातील शर्करायुक्त रस ही मुख्य उत्पन्नाची बाब आहे. फुलोरे महाछदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा करतात. आंबवल्यावर या रसाची ताडी बनते; ती मादक पेय आहे. रसापासून गूळ व साखरही करतात. मादी–झाडापासून नर–झाडापेक्षा जवळजवळ दीडपट जास्त रसाचे उत्पादन होते. ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात, त्यात १२ टक्के साखर असते. ताडी अनेक लोकांच्या आवडीचे उत्तेजक, स्वस्त व मादक पेय असून तीत थोडी साखर आणि ‘यीस्ट’ (किण्व) नावाची सूक्ष्म वनस्पती असते; त्यावरच ताडीचा पौष्टिकपणा अवलंबून असतो, कारण यीस्टमुळे ‘ब जटिल’ या जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो; ताडी पिणाऱ्या लोकांत या जीवनसत्त्वाच्या उणीवांचे परिणाम दिसून येण्याचा संभव कमी असणे शक्य आहे. मूळ शीतक (थंडावा देणारे) व झीज भरून काढणारे असून त्याचा रस मूत्रल (लघवी साफ करणारा), उत्तेजक, कफनाशक(कफ काढून टाकणारा) असून जलशोथात (पाणी साचून झालेल्या सूजेवर) आणि दाहक विकारात गुणकारी असतो. बियांतील गर शामक व पौष्टिक असतो. हिंदू व बौद्ध धर्मीय लोक ताडाला पूज्य मानतात.

फळामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. पूर्व जावा, इंडोनेशियामध्ये, हे बर्याचदा पारंपारिक औषधांमध्ये वापरले जाते; कळ्या विशेषतः लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून वापरली जाते. प्रयोगशाळेच्या सेटिंगमध्ये मोजले असता पाल्मिराच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म असल्याचे देखील दिसून आले आहेपालमायराचे फळ कच्चे खाल्ले जाते तर बाहेरील थर अद्याप कच्चा असतो. परिपक्व होण्यासाठी सोडल्यास, बाहेरील थर कच्चा, उकडलेला किंवा भाजून देखील खाऊ शकतो. या फळाची चव लिचीसारखीच असते आणि त्यात जेलीसारखी सुसंगतता असते. हे सहसा करी, मिष्टान्न आणि गोड नारळ पेयांमध्ये वापरले जाते. झाडाचा रस खजुराच्या “ताडी” (वाइन) मध्ये आंबवला जाऊ शकतो किंवा साखरेचे ब्लॉक्स बनवण्यासाठी उकळले जाऊ शकतात, ज्याला पाम ‘गुळ’ असेही म्हणतात. काही इंडोनेशियन बेटांवर, ही साखर स्थानिक आहारासाठी कार्बोहायड्रेट्सचा प्राथमिक स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त, पाम कंद हे खाण्यायोग्य स्टार्चचे स्त्रोत आहेत जे पीठ बनवता येत.

सामान्य उपयोग

  ताडाचे खोड भरीव, आतून फिकट तपकिरी रंगाचे व मऊ असते; त्याच्या उभ्या छेदात सुंदर रेषा दिसतात. पृष्टभाग कठीण आणि 
लांब धाग्यांचा बनलेला असतो.बाहेरचे कठीण लाकूड खांब, वासे,
फळ्या इत्यादींकरिता वापरतात कारण ते मजबूत व टिकाऊ असते. 
तळभाग सुटा करून व पोखरून बादलीसारखा वापरतात. 
इतर सरळ भाग पोखरून त्यांचा पाणी वाहून नेण्यास पन्हळाप्रमाणे
 उपयोग होतो. पंखे, छपरे, चटया, छत्र्या, हॅट, होडगी, टोपल्या इत्यादींकरिता पानांचा उपयोग करतात. पूर्वी पाने 
लिहिण्याकरिता वापरीत. पानांच्या देठांपासून व मध्यशिरेपासून निघणाऱ्या राठ धाग्यांपासून झाडू, कुंचले, दोर, चुड्या इ. वस्तू 
बनविणे हा घरगुती धंदा बनला आहे.  कच्च्या बियांतील मऊ गरापासून मुरंबे वगैरे बनवितात किंवा तो तसाच खातात. 
लहान रोपटी जमिनीतून काढून भाजीप्रमाणे खातात अथवा दळून त्यांचे पीठ करतात.  बियांपासून तेल मिळते; त्या भाजूनही
 खातात.  या झाडापासून मिळणारा डिंक काळा व चमकदार असतो. भारतात, या झाडाचा उल्लेख "ताला विलासम" या 
प्रसिद्ध तमिळ कवितेमध्ये "जीवनाचे झाड" म्हणून करण्यात आला आहे, ज्यामध्ये अन्न आणि औषधापासून ते सुतारकाम
 आणि छतावरील खाज घालण्यापर्यंतचे 801 उपयोग आहेत. पालमायराचे लाकूड बांधकामात वापरले जाते आणि 
 त्याचा कोळसाही बनवता येतो. त्याची पाने टोपली विणण्यासाठी किंवा  कातडीसाठी वापरली जातात. याव्यतिरिक्त, 
त्याची भव्य उंची हे एक लोकप्रिय शोभेचे झाड बनवते. भारत, कंबोडिया आणि इंडोनेशियाच्या काही भागात 
पामीरा वृक्ष देखील सांस्कृतिक प्रतीक आहे; उदाहरणार्थ, त्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य, “महाभारत” मध्ये आहे.  
काही स्त्रोतांचा असा दावा आहे  की संस्कृत वर्णमाला शोधणार्‍याने 6,000 वर्षांपूर्वी पामीरा पामची पाने लेखन सामग्री
 म्हणून वापरली होती.  या आणि इतर असंख्य भारतीय ग्रंथ आणि म्हणींमध्ये वृक्षाचा उल्लेख असल्यामुळे त्याला जादुई किंवा 
 गूढ गुणधर्म असण्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. 
आज, हे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याचे अधिकृत वृक्ष आहे.
अशा बहु उपयोगी वनस्पती लागवड हे भविष्यात चांगले ठरू उत्पन्न देणारे ठरू शकते.

No comments:

Post a Comment

  HIGHEST FOREST PERCENTAGE STATE IN INDIA ( भारतातील सर्वाधिक वन टक्केवारी असलेले राज्य ) वनांचे जागतिक महत्व  (What is the Importance of...