ADVERTISE

Friday, 24 March 2023

 

 ‘वन हक्क कायदा २००६’ कार्य पद्धती व अंमलबजावणी

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी


भारतातील सर्वांत पहिला व प्राचीन काळापासून वास्तव्यास असणारा समाज म्हणजे आदिवासी किंवा वन निवासी (मुख्यत्वेकरून वनात राहणारे अनुसूचित जमातीचे सदस्य किंवा उपजीविकेसाठी वनांवर वा वनजमिनीवर अवलंबून असलेला समाज) होय. या समाजाची स्वतंत्र भाषा, संस्कृती आहे. त्यांनी आजही ती जिवंत ठेवली आहे. त्यामुळे हा समाज स्पष्टपणे लक्षात येतो. हा समाज प्रामुख्याने निसर्ग पूजक असून पूर्णपणे निसर्गाशी एकरूप झालेला आहे.आदिवासी जमतीच्या संदर्भात आपण जेव्हा अभ्यास करतो तर सर्वाधिक जंगलाशी निगडीत त्यांची अर्थव्यवस्था असते.सोबतच कृषी सुद्धा अलीकडे महत्वाचे क्षेत्र आहे.भूमी आणि जंगले यावरील आपला अधिकार परत घेण्यासाठी आदिवासी क्षेत्रात लहन मोठ्या लहान मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या.अशीच “ चिपको आंदोलन”या नावाने ओडखला जातो.जेव्हा जंगल ठेकेदार जंगलातील झाडावर आपल्या मजुरांमार्फत कुर्हाड चालवतात .त्याचवेळेत झाडांना वाचविण्यासाठी लोक झाडाला चीपक्तता “आम्हाला तोडा परंतु झाडे तोडू नका.अशी त्यांची मागणी होती अनेक परकीय आक्रमणे होऊनही निकराने लढा देऊन त्यांनी जंगल वाचवले आहे अगदी स्वातंत्र्य आंदोलना मध्ये जंगल सत्याग्रह,झालीत उदा. २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज राजवटीत इंग्रजांनी चिरनेर परिसरातील चिरनेरसह, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे आदी गावातील हक्काच्या जंगलावरील लाकडे तोडण्यास गावकऱ्यांस विरोध केल्याने गावांतील शेतकरी, कातकरी वर्गाने काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळा इत्यादी लाकडी, लोखंडी अवजारे हातात घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. ह्यासाठी लोक घरांतून रस्त्यावर आले होते. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, त्या चळवळीला पाठिंबा देत उरणमधील शेतकऱ्यांनीही आपल्या जिवाची पर्वा न करता सत्याग्रह करून इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता.

यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारामुळे व मारहाणीमुळे अनेक जण अपंग झाले तर नाग्या महादू कातकरी (चिरनेर, अक्कादेवी वाडी), धाकू गवत्या फोफेरकर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या वीरपुरुषांना जीव गमवावा लागला, आणि ते हुतात्मे झाले. २५ सप्टेंबर१९३० रोजी हा जंगल सत्याग्रह झाला, या सत्याग्रहाला चिरनेरचा जंगल सत्याग्रह म्हणतात.

 

 कालांतराने शेतीचे तंत्रज्ञान माहीत झाल्यानंतर त्यानेपडित जमिनीला शेतीमध्ये रूपांतरित केले व शेती करून आणि जंगलातील गौण वनोत्पादनाद्वारे (यामध्ये बांबू, खुरटी झाडी, खोड, वेत, कोसा, रेश्मी किड्यांचे कोश, मध, मेण, लाख, तेंदू किंवा केंदू पत्ता, औषधी वनस्पती आणि कंदमुळे, मुळे, लहान खोडे इ.) आपले आयुष्य जगत आला आहे.

 

भूसंपादन कायदा’

आदिवासी समाजाच्या पारंपरिक जीवनाला खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्तेने आव्हान दिले. तेही या समाजाने निकराने लढा देऊन हाणून पाडले. परिणामी ब्रिटिशांनी १८९४ साली ‘भूसंपादन कायदा’ मंजूर करून जंगलातील साधनसंपत्तीवर शासनाचा अधिकार प्रस्थापित करून केला. त्यामुळे ब्रिटिश शासनाने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजावर अत्याचार करून जंगलातील साधनसंपत्ती मिळवली. परिणामी हा समाज मुख्य धारेतील समाजाच्या दावणीला बांधला गेला. परंतु क्रांतिकारी व पुरोगामी पक्ष, संघटनांच्या लढ्यामुळे या समाजाला स्वातंत्र्यानंतर काही प्रमाणात अधिकार मिळाले.त्यानंतर च्या काळात अनेक बिगर शासकीय व स्वयंसेवी संघटनानी  आदिवासी समाजामध्ये जागृती निर्माण करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून दिले.

 

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६


या समाजाला आणि इतर पारंपरिक वननिवासी (१३ डिसेंबर २००५ पूर्वी किमान तीन पिढ्यांपासून मुख्यत्वेकरून वनात राहणारा आणि उपजीविकेसाठी वनांवर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारे) यांना ते वनातील ज्या जमिनी कसत होते, त्यावर त्यांचा अधिकार नव्हता. तो अधिकार ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६’नुसार मिळाला. हा अधिनियम जम्मू व काश्मीर या राज्याखेरीज संपूर्ण भारतात लागू आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना कलम ३(१) नुसार वैयक्तिक व सामूहिक वन हक्क किंवा दोन्हींचे धारणाधिकार प्राप्त झालेले आहेत. १ जानेवारी २००८पासून हा अधिनियम अंमलात आणण्यास सुरुवात झाली.

 

वन हक्क कायदा अंमलबजावणीसाठी प्राधिकार व कार्यपद्धती

सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ कलम ३(१) (झ) नुसार निरंतर वापर करण्यासाठी पारंपरिक संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोतांचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करणे कलम ५नुसार वन्यजीवन, वन व जैविक विविधता यांचे संरक्षण करण्यासाठी व नियम ४(१)(च)च्या तरतुदीनुसार कर्तव्ये पार पाडण्यासाठी ग्रामसभा तिच्या सदस्यांमधून नियम ४(१) (ड) अन्वये एक समिती गठित करेल. संबंधित ग्रामसभांतर्गत नियम (१) (ड)नुसार स्थापन केलेल्या समितीला ‘सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती’ (CFRMC) असे संबोधण्यात यावे. त्या समितीचे सनियंत्रण ग्रामसभा करेल.

 

ग्रामसभा :


ग्रामसभा ग्रामपंचायतीकडून बोलावण्यात येईल आणि तिच्या पहिल्या बैठकीत ती सभा आपल्या सदस्यांमधून दहापेक्षा कमी नाहीत; परंतु पंधरा व्यक्तींपेक्षा अधिक नाहीत, इतक्या सदस्यांची एक वन हक्क समिती निवडील.

 

ग्रामसभा वनविषयक हक्कांचे स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याची प्रक्रिया सुरू करील. त्याच्याशी संबंधित मागण्या स्वीकारील व त्याची सुनावणी करील.

 

वनविषयक हक्कांमधील हितसंबंधित व्यक्तीला आणि संबंधित प्राधिकरणाला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर वनविषयक हक्कांवरील मागण्यांच्या बाबतीत ठराव पास करेल आणि तो उपविभागीय स्तरावरील समितीकडे पाठवेल.

 

उपविभागीय स्तरावरील समिती

 

ग्रामसभेच्या निर्णयाने बाधित झालेली कोणतीही व्यक्ती, निर्णयाच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत उपविभागीय स्तरावरील समितीकडे विनंती अर्ज फाईल करू शकेल.

 

उपविभागीय स्तरावरील समिती सुनावणीसाठी तारीख निश्चित करेल आणि विनंती अर्जदाराला व संबंधित ग्रामसभेला ती लेखी कळवेल, तसेच सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या किमान पंधरा दिवस आधी विनंती अर्जदार राहत असलेल्या गावातील सोयीस्कर अशा सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावूनही कळवील.

 

उपविभागीय स्तरावरील समिती विनंती अर्जाला अनुमती देईल किंवा तो नाकारेल किंवा तो विनंतीअर्ज संबंधित ग्रामसभेकडे तिच्या विचारार्थ निर्देशित करील.

 

असा निर्देश मिळाल्यानंतर, ३० दिवसांच्या आत ग्रामसभा बैठक घेईल. विनंती अर्जदाराचे म्हणणे ऐकेल, त्या संदर्भातला ठराव पास करेल आणि तो उपविभागीय स्तरावरील समितीकडे पाठवेल.

 

उपविभागीय पातळीवरील समिती ग्रामसभेच्या ठरावावर विचार करेल आणि तो विनंतीअर्ज स्वीकारणारा किंवा नाकारणारा समुचित आदेश पास करेल.

 

प्रलंबित विनंतीअर्जास बाधा न येऊ देता उपविभागीय स्तरावरील समिती इतर मागणीकारांच्या वनहक्कांचे अभिलेख तपासून त्याची तुलना करेल आणि संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत तो जिल्हा स्तरावरील समितीला सादर करील.

 

जिल्हा स्तरावरील समिती : १) उपविभागीय स्तरावरील समितीच्या निर्णयाने बाधित झालेली कोणतीही व्यक्ती, निर्णयाच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत जिल्हा स्तरावरील समितीकडे विनंती अर्ज फाईल करू शकेल. २) जिल्हा स्तरावरील समिती सुनावणीसाठी तारीख निश्चित करेल आणि विनंती अर्जदाराला व संबंधित उपविभागीय स्तरावरील समितीला ती लेखी कळवेल, तसेच सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या किमान १५ दिवस आधी विनंती अर्जदार राहत असलेल्या गावातील सोयीस्कर अशा सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावूनही कळवील. ३) जिल्हा स्तरावरील समिती विनंती अर्जाला अनुमती देईल किंवा तो नाकारेल किंवा तो विनंतीअर्ज संबंधित उपविभागीय स्तरावरील समितीकडे तिच्या विचारार्थ निर्देशित करेल. ४) असा निर्देश मिळाल्यानंतर उपविभागीय स्तरावरील समिती  विनंती अर्जदाराचे व ग्रामसभेचे म्हणणे ऐकेल, त्या संदर्भातला ठराव पास करेल आणि तो जिल्हा स्तरावरील समितीकडे पाठवेल. ५) जिल्हा पातळीवरील समिती उपविभागीय स्तरावरील समितीच्या ठरावावर विचार करेल आणि तो विनंतीअर्ज स्वीकारणारा किंवा नाकारणारा समुचित आदेश पास करेल. ६) जिल्हा स्तरावरील समिती अर्जदारांच्या वनविषयक हक्कांचे अभिलेख शासकीय अभिलेखात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा जिल्हा आयुक्ताकडे पाठवतील.

 

 

Thursday, 23 March 2023

 

बांबु गवत :निसर्गाचा चमत्कार

 
आपल्या सर्वाच्या परिचयाचा अत्यंत उपयोगी असा बांबू. बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन 
जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. समशीतोष्ण आणि उष्ण हवामान बांबूला मानवते, 
भारतातील काश्मीर सोडून इतर सर्व राज्यांत मैदानी आणि डोंगराळ भागात बांबू होतो. गडचिरोली व लगतच्या जिल्ह्यांमध्ये 
अलीकडे ग्राम सभांद्वारे अलीकडे वन हक्क कायद्यानुसार सामुहिक बांबू व्यवस्थापन व विक्री केली जाते.जी जगातील  प्रत्येक संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची आहे, जी पृथ्वी मातेला हानी पोहोचवणाऱ्या वयोवृद्ध सामग्रीसाठी योग्य बदल म्हणून काम करते.बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर निसर्ग आणि मानवजात या दोघांसाठीही एक कल्पतरू म्हणून तारणारा वान्साप्ती असेल.
कदाचित तुम्हाला माहिती नसेल की उन्हाळ्यात बांबू वारंवार वाढतो आणि फुलतो. नर बांबू घन असतो आणि मादी बांबू पोळा किंवा मऊ असतो आणि पावसाळ्यात ढगांच्या जोरदार गर्जनेमुळे बांबूच्या सणांमध्ये भगदाड निर्माण होते. बांबूच्या अनेक जाती आहेत ज्यात फुले आयुष्यात एकदाच येतात आणि लवकर नष्ट होतात. बांबूच्या फार कमी जाती आहेत जिथे दरवर्षी फुले येतात, तर काही जातींमध्ये दर तीन वर्षांनी फुले येतात.वर नमूद केलेल्या राजवंशाच्या प्राथमिक प्रजातींव्यतिरिक्त, आणखी एक प्रजाती (सुवर्ण राजवंश, पिवळा राजवंश किंवा पिवळा बांबू) थेरपीमध्ये आढळते. सुवर्ण आणि सुवर्ण राजवंश: बांबुसा वल्गारिस श्रॅड. सुमारे 18 मीटर पर्यंत, ते उंच आणि मध्यम-स्वभावाचे आहे. त्याचे नाजूक, पिवळे स्टेम पोला म्हणून ओळखले जाते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन बांबूसाठी आवश्यक असते.

वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने :

बांबू हा तृण कुळातील पोअ‍ॅसी (ग्रामिनी) कुटुंबातील आहे. बांबू वृक्षाप्रमाणे उंच वाढतो. त्याचे जीवनचक्र अनेक वर्षांचे असते. खोड टणक आणि सकाष्ट आहे. त्याला कांडे, पेरे, असून पेरावर डोळे असतात. बांबूला सोटमूळ नसते. बुंधा जमिनीत खोलवर न जाता जमिनीला समांतर जातो. रांगते खोड पसरून पेरांवरील नवीन कोंब बाहेर येतात. या कोंबातूनच बांबूची उत्पत्ती होते. कोंब जमिनीबाहेर येऊन सरळ आणि उंच वाढतात फांद्या १० -४० सेमी लांब असतात. पानांत विविधता असते. फुले अतिशय लहान आणि झुबक्यात येतात. फुलांमध्ये बीजधारणा झाली की बांबू मरतो. हा काळ बांबूच्या बाबतीत साधारण ३५ ते ६० वर्षांचा असतो. जातीनुसार कमी-जास्त होतो. जातीनुसार बांबूचे रंग आणि जाडीत फरक पडतो. भारतात साधारणपणे बांबूच्या २२ जाती आणि १०० ते १२० प्रजाती आहेत. त्यापकी ५०%  बांबू हा पूर्व भारतात होतो. . वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले आहे .

उपयोग 
बांबूची वजन पेलण्याची क्षमता उत्तम असते, त्यामुळे त्याचा अनेक वर्षांपासून घरबांधणी, नौकाबांधणी, छायागृह, अशा विविध कारणांसाठी उपयोग होतो. आजकाल हरितगृहाचा सांगाडा करण्यासाठीही बांबू वापरतात. बांबू आतून पोकळ असल्याने त्याच्या सरळ फळ्या कापता येत नाहीत. बांबूच्या अरुंद आणि पातळ पट्टय़ा कापतात. या पट्टय़ा कापून त्या शिजवतात. शिजवताना त्यातील स्टार्च काढून टाकला जातो. या पट्टय़ा वाळवतात, त्यांना सरसासारखा चिकट पदार्थ लावून गठ्ठे करतात. गठ्ठे रांधून लहान फळ्या किंवा प्लाय बोर्ड करतात. बांबूचा उपयोग हा कागदनिर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. बांबूचे कोवळे कोंब खातात. 
भाजी करतात. बांबूपासून औषधेही बनवितात. बांबूतील औषधी द्रव्याचा उपयोग कफ, पित्त या दोषांवर होतो. बांबूचे पेर, पाने, अंकुर, फुले सर्व औषधी आहेत.बांबू हा आपल्या देशात एक व्यवसाय आहे हा व्यवसाय टोपले सूप हे लोग बांबूचा वापर करतात हे बांबूची प्रकार आहेत तुम्ही बांबू गल्ली कव्हा गेला आहेत का इथे बघा बांबू असाच तुम्हाला कधी विचार आला असेल की हे बांबू कशासाठी आहे तर ते मी आता सांगतो कि ते बांबू टोपले सूप वीण आर्या लोकांसाठी असतात


बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल आणि इतकेच काय डायपरसुद्धा मिळतात. सायकलींच्या फ्रेम्स, स्केटिंग करण्याच्या फळ्या किंवा लॅपटॉप संगणकांचे बाह्य कवच ह्या गोष्टी सुद्धा बांबूंपासून बनवल्या जातात. बांबूची अशी उत्पादने किती कठीण असतील याबाबत शंका व्यक्त केली जाते. बांबू किती जुना आहे यावर त्याचा कठीणपणा अवलंबून असतो. तज्‍ज्ञांच्या मते ५ ते ६ वर्ष जुने बांबूचे पीक पुरेसे कठीण असते. असा बांबू वापरून व योग्य उत्पादन प्रक्रिया केलेले बांबूचे


 फ्लोअरिंग हे लाकडापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी दर्जाचे नसते.
बांबूचे फ्लोअरिंग व तक्ते हे दिवसेंदिवस त्यांचे नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणाला मदत करणारा ‘हरितपणा’ यामुळे लोकप्रिय होत आहेत. उपनगरातील घरे, सरकारी इमारती, हॉटेले, रेस्टॉरंट, शाळा या सर्व ठिकाणी बांबूचे फ्लोअरिंग वापरणे शक्य आहे. ज्यावेळी बांधकामात लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल असा दिवस फारसा दूर नसावा.बांबू बासरी बनवण्या साठी उपयोगी पडतो बांबूची मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात. जमिनीतील सेंद्रियता आणि भुसभुशीतपणा वाढवण्यास बांबूची मदत होते.

औषधी गुणधर्म

बांबूचे नैसर्गिक परिणाम गोड, आम्लयुक्त, तिखट, कडू, जड, कोरडे आणि थंड असतात. हे पित्त आणि कफ कमी करण्यास मदत करते. कुष्ठरोग, व्रण किंवा व्रण, जळजळ, लघवी किंवा लघवीचे आजार, उबळ किंवा मधुमेह, मूळव्याध किंवा मूळव्याध आणि चिडचिड हे सर्व बांबूच्या फायद्यांमुळे कमी होऊ शकतात. बांबूची रोपे कोरडी, जड, मल-मूत्र आणि कफ उत्तेजक, तसेच कडू, गोड, मसालेदार, आम्लयुक्त किंवा आम्लयुक्त आणि कोरडी असतात. याव्यतिरिक्त मूत्राशय संक्रमण, नाक किंवा कानात रक्तस्त्राव आणि जळजळ होण्यास मदत होते. कुष्ठरोग, कमळा किंवा कावीळ, रक्तस्त्राव किंवा रक्ताच्या उलट्या, बोकडाचा दाह, खोकला, धाप लागणे, लघवी किंवा लघवीचे आजार, लघवीचे आजार, स्टोमाटायटीस, ताप किंवा ताप, तहान, जळजळ किंवा उष्णता, अशक्तपणामध्ये चिकूचे फायदे डोळ्यांच्या विकारांवर आणि डोळ्यांच्या विकारांसाठी फायदे.सामान्य कमजोरी. बांबूचे मूळ त्याच्या नैसर्गिक थंड गुणधर्मामुळे थंड होते. हे शरीरातून विष्ठा आणि मूत्र काढून टाकण्यास देखील मदत करते, लघवीच्या आजारांसाठी उपयुक्त आहे आणि शक्ती वाढवते. याव्यतिरिक्त, त्याची पाने ताप, डोळ्यांच्या समस्या आणि सर्दीपासून आराम करण्यास मदत करतात.

बांबू रोपाचे फायदे 

बांबूची झाडे घरामध्ये उगवली जाऊ शकतात आणि त्यांचे बरेच फायदे आहेत.
·   बांबू वनस्पती सकारात्मकतेला आकर्षित करते
पौष्टिक बांबू हिरवागार आणि रसाळ असतो. तुमचा दिवस उजळण्यासाठी आणि गोष्टी बदलण्यासाठी या सर्व गोष्टींवर एक नजर टाका. नशीब आणि सकारात्मक ऊर्जा बांबूकडे ओढली जाते. तुम्हाला संपत्ती आणि सौभाग्य हवे असेल तर तुमचा बांबू तुमच्या घराच्या समोरच्या दरवाजाजवळ ठेवा.
·   बांबूची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य वाढवते
घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी बांबू आश्चर्यकारकपणे वाढतो. तुम्ही भाग्यवान बांबूला वेगवेगळ्या प्रकारे वाकण्यासाठी आणि फिरवायला प्रशिक्षित करू शकता जर तुम्ही त्याची आपपानीमध्ये लागवड केली. याव्यतिरिक्त, आपण एकाच वेळी विविध बांबू वनस्पती प्रजाती व्यवस्था करू शकता. उदाहरणार्थ, सर्व रंग आणि आकारांचे बांबूचे दांडे एकत्रित करण्याचा प्रयत्न करा. नशीबवान बांबू विविध उंचीवर देखील कापले जाऊ शकतात जे अधिक सौंदर्यदृष्ट्या आनंददायक आहेत.
·  बांबू वनस्पती हवा शुद्ध करते
बांबू ही एक वनस्पती आहे जी ऑक्सिजन तयार करण्याची आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे हवा शुद्ध करते. कुंडीत लावलेल्या वनस्पतीप्रमाणे ठेवून तुम्ही घरामध्ये स्वच्छ हवा श्वास घेऊ शकता. बांबूद्वारे बेंझिन आणि इतर प्रदूषक हवेतून काढून टाकले जाऊ शकतात. तुमच्या बेडरूमसाठी किंवा घरातील इतर कोणत्याही खोलीसाठी ही एक विलक्षण वनस्पती आहे.
·   बांबूची लागवड करणे सोपे आहे
जर तुम्हाला तुमच्या इतर झाडांची देखभाल करण्यात अडचण येत असेल तर बांबू तुमच्यासाठी योग्य वनस्पती आहे. बारमाही वनस्पती अत्यंत कोरडे-प्रतिरोधक आहे. हे एकतर पाण्यात किंवा भांडी भरलेल्या भांड्यात वाढू शकते. हे तुम्हाला अधिक किंवा कमी पाणी देण्याची चिंता न करता घरी जिवंत वनस्पती वाढवण्याची संधी देते.
·  बांबू वनस्पती संतुलन मजबूत करते
प्राचीन शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवरील पाच घटक, अग्नि, वायु, पाणी आणि लाकूड हे पृथ्वीवरील सर्व काही बनवतात. जेव्हा हे घटक योग्यरित्या संतुलित असतात तेव्हा आम्ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी दरवाजे उघडतो. निसर्गाच्या पाच घटकांमध्ये, बांबू लाकडासाठी उभा आहे. तुमच्या घरातील बांबूचे रोप पाचही घटकांना संतुलित ठेवते आणि त्याच्याभोवती लाल रिबन ठेवून काही नाणी आणि खडे टाकून पाण्यात उगवल्यावर सुसंवाद वाढवते.
·   बांबूचे रोप हे नशीबाचे आकर्षण आहे
आपण कधीही खूप भाग्यवान असू शकत नाही. याव्यतिरिक्त, वास्तूनुसार, किरमिजी रंगाच्या रिबनला बांधलेले काही बांबूचे देठ हे भाग्याचे लक्षण आहे. हे तुमच्या होम ऑफिसमध्ये ठेवता येते किंवा खास प्रसंगांसाठी टेबल डेकोर म्हणून वापरले जाऊ शकते. गृहिणी, प्रमुख व्यक्ती आणि इतर तत्सम प्रसंगांसाठी बांबू एक योग्य भेट आहे. चौथा क्रमांक अशुभ असल्याने तुम्ही कधीही तुमचा बांबू ४ च्या गटात ठेवू नये.
·  बांबूच्या वनस्पतीचा चहा पचनास मदत करतो
बांबूच्या रोपामुळे तुमच्या आरोग्याला लगेच फायदा होतो. ताजी बांबूची पाने उकळून चहा बनवता येतो. या निरोगी पेयातील सिलिका सामग्री चांगले पचन आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते रक्ताभिसरण स्वच्छता आणि कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनात मदत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दररोज बांबूच्या पानांचा गरम कप तयार करू शकता.
·   बांबूचे रोप नशीब आकर्षित करते
कठोर परिश्रमाची जागा नशीब किंवा कंपने घेऊ शकत नाही, परंतु योग्य ऊर्जा आकर्षित करणे नेहमीच फायदेशीर असते. वास्तूनुसार बांबूच्या झाडांचा एक फायदा म्हणजे ते धन आणि नशीब मिळवतात. तुम्ही एकाच वेळी किती बांबूच्या देठांची लागवड करता यावर त्याचा प्रभाव पडतो. चांगल्या नशिबासाठी बांबूला ८ किंवा ९ देठांच्या क्लस्टरमध्ये व्यवस्थित करा.
·   बांबूच्या रोपामुळे तुमच्या घरात आनंद येतो
वास्तुकलेसाठी बांबूचे फायदे तुम्ही घरात किती देठ ठेवता यावर अवलंबून असतात. तीन किंवा सहा बांबू देठ आनंद आणतात, तर दोन बांबू देठ प्रेम आणि एक चांगला विवाह आणण्यासाठी मानले जाते. दृष्य आवड जोडण्यासाठी विविध बांबूचे देठ किंवा भिन्न उंची वापरा.
·  बांबूचे रोप तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते
योग्य वास्तु घटक जोडून रोगांचा धोका कमी करता येतो. बांबूचे पाच कांडे एका डब्यात ठेवा जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल. बांबूची कोणतीही विविधता करेल. चांगल्या आरोग्याचे प्रतिनिधित्व पर्यायाने बांबूचे सात देठ एकत्र वाढू शकतात.
वंशलोचन हे रक्त शुद्ध करणारे, वात शक्तिवर्धक, कडू, गोड, थंड, उग्र, पौष्टिक, वीर्य किंवा वीर्य वाढवणारे, मनोहारी आणि शक्तिवर्धक आहे. ते तहान, खोकला, ताप, क्षय, रक्तदाब, नाक किंवा कान रक्तस्राव, कुष्ठरोग, पांडू किंवा अशक्तपणा, लघवी किंवा लघवीचे आजार, अपचन, चिडचिड यापासून आराम देते. तहान, खोकला, ताप, क्षय आणि अशक्तपणा यांवरही ते मदत करते.
आशिया खंडातील बांबूच्या जाती व त्यांची शेती  ....
चीन आणि एशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात, त्यापासून अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, ७५ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात.भारतात पुढील काही बम्बुंची जाती प्रामुख्याने जंगलात नैसर्गिक रित्या वाढतात किंवा त्यांची लागवड केली जाते.
·        बांबू चे नाव: मानवेल
शास्त्रीय नाव: Dendrocalamus strictus (डेन्ड्रोक्येल्यामस स्ट्रीकटस् )
फुलण्याचा कालावधी: ३०-३५ वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-५० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या
घ्यावयाची काळजी : ह्या बांबू ची लागवड केल्यावर वेळोवेळी फांद्यांची तसे वेड्या वाकड्या काठ्यांची छाटणी करणे आवश्यक असते.
 
·        बांबू चे नाव: माणगा, मेस
शास्त्रीय नाव: Dendrocalamus stocksii (डेन्ड्रोक्येल्यामस स्टोक्सी )
फुलण्याचा कालावधी: ठराविक असा नाही.
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या
घ्यावयाची काळजी: हा बांबू सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
 
·        बांबू चे नाव: एस्पर
शास्त्रीय नाव: Dendrocalamus asper (डेन्ड्रोक्येल्यामस एस्पर )
फुलण्याचा कालावधी: ६०-८० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ६-८ इंच
उपयोग: खाण्यासाठी कोंब, बांधकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard,
 
घ्यावयाची काळजी: हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
 
·        बांबू चे नाव: बुल्का, वनन, ब्रांडीसी
शास्त्रीय नाव: Dendrocalamus brandisii (डेन्ड्रोक्येल्यामस ब्रांडीसी )
फुलण्याचा कालावधी: ४५-६० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ६-८ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब,
घ्यावयाची काळजी: हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
 
·        बांबू चे नाव: कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबां
शास्त्रीय नाव: Bambusa bambos (बांबूसा बांबोस)
फुलण्याचा कालावधी: ३५-५० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ५-६ इंच
उपयोग: बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, औषधी पाने, चारा.
घ्यावयाची काळजी: हा बांबू काटेरी असल्याने याची लागवड आणि व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा हा बांबू कापायला अतिशय त्रास होतो. जर काटेकोर पणे योग्य व्यवस्थापन होणार असेल तर लागवडीला हरकत नाही. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर या बांबूची वाढ जास्त चांगली होते.
 
·        बांबू चे नाव: टूल्डा, जाती, मित्रींगा
शास्त्रीय नाव: Bambusa tulda (बांबूसा टूल्डा)
फुलण्याचा कालावधी: ३५-६० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-४५ फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या.
घ्यावयाची काळजी: कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते.
·        बांबू चे नाव: नुटन्स, मल्ल बांस
शास्त्रीय नाव: Bambusa nutans ( बांबूसा नुतन्स )
फुलण्याचा कालावधी: ३५-४० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग:  बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG,  Plyboard
विशेष सूचना: कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब  सरळ यायला मदत होते. या बांबूची वेगवेगळया वातावरणात प्रायोगिक तत्वावर लागवड व्हायची गरज आहे.
·        बांबू चे नाव: भालुका, बराक, बाल्कू, भीमा
शास्त्रीय नाव: Bambusa balcooa ( बांबूसा बाल्कूवा )
फुलण्याचा कालावधी: ३५-४५ वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-५० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ३-५ इंच
उपयोग:  बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG
घ्यावयाची काळजी: औद्योगिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा हा बांबू आहे. याची फायदेशीर लागवड करायची असेल तर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करायला हवी. एकट्या दुकट्याने लागवड केली तर औद्योगिक दृष्ट्या  वापराला मर्यादा येतात. कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंड सरळ यायला मदत होते.
बांबूची लागवड केल्यापासून सुमारे पाच वर्षांनंतर त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर सुमारे साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते.
बांबू पिकाचे वैशिष्ट्य
जमिनीत लावलेल्या कंदापासून बांबूची वाढ होते. बांबूच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला पाणी आणि खते अतिशय कमी प्रमाणात लागतात. तसेच या पिकाची रोगप्रतिबंधक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापरसुद्धा कमी होतो.एकूणच इतर पिकांच्या मानाने किफायतशीर आहे.

उत्पादन

बांबूचे आशियामधले उत्पादन गेल्या वीस वर्षांत झपाट्याने वाढले आहे. २००८ मध्ये चीनमधेच बांबूचे उत्पादन २००० मधल्या उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. जमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर ग्रामीण चिनी शेतकरी वर्षानुवर्षे बांबूचे उत्पादन घेत आलेले आहेत. हे उत्पादन आता त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते आहे. या सगळ्या कारणांमुळेच बांबूच्या पिकाला हरित उत्पादन म्हणणे शक्य आहे. फ्लोअरिंगचे साधारण ५ टक्क्यांपर्यंतचे घाउक मार्केट आता बांबू फ्लोअरिंगने काबीज केले आहे.
 प्रक्रिया
बांबू एखाद्या नळीसारखा असल्याने त्याच्या लाकडासारख्या चिरून फ़ळ्या करता येत नाहीत. त्यामुळे थोडी निराळी पद्धत अवलंबावी लागते. बांबूच्या पातळ व अरूंद पट्ट्या कापण्यात येतात. या दोन्ही बाजूंनी रंधून सपाट व गुळगुळीत बनवतात. अशा पट्ट्या कुकरमधे शिजवून त्यांच्यातील, कृमी-कीटकांना प्रिय असलेला, स्टार्च काढून टाकला जातो व नंतर त्या भट्ट्यांमध्ये वाळविल्या जातात. वाळविलेल्या पट्ट्याना सरस लावून त्यांचे गठ्ठे केले जातात. हे गठ्ठे प्रचंड दाब व उष्णता यांच्याखाली ठेवण्यात येतात. वाळलेल्या गठ्ठ्यांना रंधून त्यांचे फळ्या किंवा प्लाय-बोर्डचे तक्ते या स्वरूपातले व्यापारी उत्पादन तयार होते. या शिवाय बांबूचे अतिशय छोटे तुकडे सरसामधे भिजवून याच पद्धतीने त्यांच्या विटा किंवा तक्तेही बनवले जातात. या सर्व उत्पादनांना नैसर्गिक रंगही ठेवता येतो किंवा रंग वापरून आपणास पाहिजे ती रंगछटा उत्पादित करता येते.
बांबूचे प्राण्यांच्या आहारातील स्थान
बांबूची कोवळी पाने, फांद्या, कोंब हे चीनमधील जायंट पांडा व नेपाळ मधील लाल रंगाच्या पांडाचे मुख्य अन्न आहे.काही वेळेस उंदीर याची फळे खातात.आफ्रिकेतील जंगलातील गोरिलासुद्धा बांबूचे सेवन करतात.
...........................................

 श्रीमती अश्विनी आणि श्री योगेश शिंदे  यांच्या द्वारे बांबू इंडिया मिशन हे पुणे स्थित, बांबू वर आधारित स्टार्ट अप आहे. ऑगस्ट 2016.  सालापासून बांबूची धारणा बदलण्याचे प्राथमिक उद्दिष्ट नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान  वापरून प्लास्टिक उत्पादनांची जागा बांबूची उत्पादने घेतील या विचारणे जसे बांबू टूथब्रश, बांबू इअर कळ्या, कॉर्पोरेट गिफ्ट,कलाकुसर आणि बरेच काही मानवी उपयोगी वस्तू यामध्ये आहेत.व प्रदूषणरोधी व परायावर्णाच्या दृष्टीने हितकारक वस्तू वान्विण्याचे उद्धिष्ट ठेवलेलं आहे.त्यांचे ब्रीद वाक्य आहे.“हे उत्पन्नासाठी नाही, तर निसर्गातील परिणामासाठी आहे”
 लेख आवडले असेल तर .....बांबू इंडिया मिशन या ची यशोगाथा आपण पुढील भागात जाणून घेवूयात 

Wednesday, 22 March 2023

  

ताडाचे झाड :(जीवनाचे झाड ) एक बहुगुणी झाड

  महारष्ट्रात प्रामुख्याने गडचिरोली जिल्हात आढळून येणारे ताडाचे झाड  निरा या पेयासाठी आणि ताडगोळा या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष आहे .माझ्या शेत मध्ये १५.१६ वृक्ष आहेत. ताडीच्या झाडांना कोणतीही मशागत करावी लागत नाही फक्त मुबलक पाणी आणि झाडांचे संगोपन करून शेताच्या बांधावर जरी झाडे लावली तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते,  नीरा हे पेय आमचं गावात खूपच प्रिय असून अलीकडे मात्र कुशल नीरा काढणारे वरिष्ठ मंडळींची कमतरता व नीरा काढण्यात रस कमी झाल्यामुळे स्थानिक मंडळी खूप कामी प्रमाणात दिसतात .त्यामुळे तेलंगाना व आंध्र प्रदेश येतून येणारी अतिशाल कुशल मंडळी असतात.तीन -चार महिन्यात लाखो रुपये कमी करून जात असतात तसेच प्रमाना पेक्षा जास्त नीरा कडून चटणी केल्यामुळे बरीच वृक्ष  नामशेष झाली आहेत .नामशेष झालेले ही झाडे शासनाने लावण्यासाठी प्रयत्न करावेत. वनविभाच्या नर्सरीमध्ये ही झाडे वाढवून गरजू शेतकऱ्यांना दिली तर त्यातून शासनाचा महसून वाढेल आणि नीरा व्यवसायाला चालना मिळू शकते. त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो,.आमच्या गावात पाव म्हणजेच २५० मी .ली . नीरा २०/- रुपये या प्रमाणे विकल्या जाते. सध्या डुप्लिकेट ताडीच जास्त मिळते. ही ताडी विशिष्ठ प्रकारच्या गोळ्या पाण्यात टाकुन बनवतात. गोळ्यांचे प्रमाण जास्त झाल्यास जिवीत हानी होते. त्यामुळे कोणाला ताडी पिण्याची लहर आल्यास सरळ ताडीच्या बगिच्यात जावे. ताडीच्या दुकानात भेसळीची ताडी असण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच शुध्द निराही सध्या दुर्लभच झालीय.  या भागात या वृक्षा  विषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सर्व प्रथम खालील माहिती बघू.

वनस्पतीशास्त्रतील माहिती

 Taxonomy

Kingdom

Plantae

Phylum

Tracheophyta

Class

Liliopsida

Order

Arecales

Family

Arecaceae

Genus

Borassus

Species

Borassus flabellifer L.

               ग्रीक शास्त्रज्ञ हीरॉडोटस (ख्रि. पू. सु. ४२०) यांना ताडीची माहिती होती.ताड हा वृक्ष अ‍ॅरॅकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसस फ्लॅबेलिफर आहे. शिंदी, खजूर, माड (नारळ) या वनस्पतींही अ‍ॅरॅकेसी कुलातील आहेत. ताड हा दूरवरून नारळासारखा दिसतो. तो मूळचा दक्षिण आशियातील असून इंडोनेशिया ते पाकिस्तान या देशांत आढळतो. मूलतः तो आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या समुद्रकिनारी), श्रीलंकेत व ब्रह्मदेशात आहे. तो भारताच्या मैदानी प्रदेशात, उत्तर प्रदेशात, दक्षिण भारतात सहज बी पडून आलेला किंवा मुद्दाम लागवड केल्यामुळे वाढलेला आढळतो; महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी पडीत जमीनीवर त्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचे जंगल बनले आहे भारतात पं. बंगाल व बिहार या राज्यांत ताड मोठ्या प्रमाणात असून इतर राज्यांतही तो आढळतो. महाराष्ट्र राज्यात ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत ताडाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात त्याला ताडगोळा वृक्ष असेही म्हणतात.

ताड हा वृक्ष सु. ३० मी. उंच वाढतो.

               खोडाचा घेर तळाशी सु. २ मी. असून ते राखाडी व दंडगोलाकार असते. खोड मध्यभागी किंचित फुगीर असते. खोडाच्या जमिनीलगत असलेली अनेक फुगीर मुळे खोडाला घट्ट धरून ठेवतात. खोड लहानपणी वाळलेल्या पानांनी आच्छादलेले असते, तर मोठेपणी त्यावर पडून गेलेल्या पानांचे वण (किण) दिसतात. सुरुवातीला ताडाची वाढ सावकाश होते, तर वय झाल्यावर ते भरभर वाढते.

               खोडाच्या टोकाला ३० ते ४० पानांचा झुबका असतो. पाने एकाआड एक, विभाजित व पंख्याच्या आकाराची असून पाते अर्धवर्तुळाकार, १-१.५ मी. रुंद, चिवट, चकचकीत व थोडेसे विभागलेले असते. पानांचे देठ लांब, दणकट, ६-१२ सेंमी. लांब असून त्यांच्या कडांवर काटे असतात. पानांची कळी उमलण्यापूर्वी पात्यास चुण्या पडून ते कळीत सामावलेले असते. फुलोरे दोन प्रकारांचे असून ते दोन वेगवेगळ्या झाडांवर येतात. त्यांना स्थूलकणिश म्हणतात. कणिश मोठे व शाखित असून अनेक छदांनी वेढलेले असते. त्यावर लहान, गुलाबी किंवा पिवळी व असंख्य नरफुले असतात. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर तसेच हलक्या जमिनीत ताडीची झाडे चांगल्या प्रकारे येतात. या झाडांना चांगल्या प्रतीच्या जमिनीची देखील गरज नसल्यामुळेकुठल्याही पडीक जागी याची लागवड करता येते. बरेचसे पक्षी निरनिराळ्या फायकसच्या फळांच्या जातीवर (वडपिंपळ, इत्यादी) उदरभरण करतात. हे पक्षी जेव्हा ताड वृक्षावर बसतात तेव्हा त्यांच्या विष्ठेतून पडलेल्या या बिया पावसाळ्यात कधी पानाच्या खाचीत रुजतात तर कधी खोडाच्या निरनिराळ्या भागात अडकून रुजू लागतात. अशी रुजलेली ही उंबर-वडाच्या जातीची झाडे ताडाच्या खाचीत त्याच्या खडबडीत खोडावर वाढू लागतात. हळूहळू ही रोपे आपली आगंतुक हवेत वाढणारी मुळे हळूच जमिनीकडे पाठवतात. ही मुळे एकदा क जमिनीपर्यंत पोहोचली कि झाडे जोमाने वाढू लागतात. मुळांना फाटे फुटून ती ताडाच्या चारही बाजूंनी पसरतात व ताडला संपूर्ण कवेत घेतात. हळूहळू या वाढणाऱ्या मूळांचा दाब या ताडाच्या खोडावर वाढू लागतो. जोपर्यंत ताड वाढत असतो आणि त्याच्या स्वतःच्या वाढीचा जोम कायम असतो, तोपर्यंत त्यावर वड-उंबराच्या झाडांचा काहीही परिणाम होत नाही. पण जेव्हा ताडाचे वय होऊ लागते व त्याचे आयुष्य नैसर्गिक रीतीने संपुष्टात येण्याच्या जवळ येऊ लागते तसा वडाच्या झाडाचा जोर वाढू लागतो आणि तो ताडाला चिरडू लागतो. अशा वृक्षांना स्ट्रॅंगलिंग फायकम असे म्हणतात.

               मादीफुले मोठी, हिरवी आणि अनेक शाखीय स्थूलकणिशावर येतात. फळ आठळीयुक्त, मोठे, गोल, करड्या व पिवळ्या रंगाचे असून त्यांत एक ते तीन बिया असतात. भ्रूणपोष पांढरा व मऊ असून मध्ये पोकळी असते. कच्च्या बियांना ताडगोळे म्हणतात. त्यातील भ्रूणपोष लोक आवडीने खातात. त्यापासून थंडावा मिळतो. ताड महत्त्वाचा आणि उपयुक्त वृक्ष आहे. त्यापासून शर्करायुक्त रस जमा करतात. त्याला शुगर पाम असेही म्हणतात. फुलोरे छदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून बाहेर पडणारा गोड रस मडक्यात जमा करतात. या ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात. नीरा काही काळ आंबल्यानंतर त्याची ताडी बनते. ताडी एक मादक पेय आहे. ताजा रस (नीरा) उकळून त्यापासून गूळ आणि इतर गोड पदार्थ बनवितात. ताडीच्या ऊर्ध्व पातनापासून मिळविलेल्या दारूस ‘अर्राक’ म्हणतात. ताडीपासून कमी प्रतीचा व्हिनेगर (शिर्का) तयार करतात.

ताडाचे खोड खांब, वासे व फळ्या बनविण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी मऊ खोड पोखरून व नळीसारखे करून पाणी वाहून नेण्यासाठी वापरतात. पाने व खोडापासून मिळणाऱ्या धाग्यांचा उपयोग झाडू, कुंचले, दोर, पायपोस बनविण्यासाठी करतात. ताडगोळे शामक व पौष्टिक असतात. नीरा उत्तेजक, थंड, मूत्रल आणि ‘क’जीवनसत्त्वयुक्त पेय म्हणून प्रसिद्ध आहे.

 

नीराबाबत थोडी माहिती.........

               ताडी हे ताडफळापासून तयार केले जाणारे पेय आहे.. ताडाच्या झाडास माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर, त्यातुन निघणारा रस. हा रस त्या केलेल्या खाचेखाली मडके बांधून त्यात गोळा करतात. हा रस प्रकृतीने थंड असतो. सूर्योदय झाल्यावर हा आंबतो. त्यापूर्वीच हा पिणे श्रेयस्कर असते. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते.उन्हाळ्यात हा पिण्याने उन्हाचा त्रास होत नाही.  महाराष्ट्र शासनाची या पेयास 'नीरा' म्हणून मान्यता आहे. शहरांमधून रस्त्यारस्त्यावर नीरा विकणारी अनेक केंद्रे असतात. नीरेमध्ये १२ टक्के साखर असते.

ताडीपासून गूळ व साखरही बनते. ताडी आंबल्यावर पहिल्या ३ ते ८ तासात तिच्यात ३ टक्के एथिल अल्कोहोल बनते. ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल ५ टक्क्यापर्यंत वाढते. त्याहून अधिक झाल्यास ताडी माणसाने पिण्याच्या लायकीची रहात नाही.

 अस म्हणतात ताडीचे दोन प्रकारचे झाड असतात, आणी दिवसातुन तिन वेळा (सकाळ, दुपार व संध्याकाळ) ताडी काढल्या जाते.
१) नर झाडः नर झाडची ताडी गोड असते, हि ताडी सहकुटुंब पिता येते, थोडिशी नशा येते, सकाळचे ताडी असेल तर नशा मुळीच येत नाही.
२) मादी झाड: मादी झाडाची ताडी आंबट असते, हि ताडी फक्त पुरुष पितात. याने नशा तर येतेच, पण पुरुषाची ताकद वैगरे वाढते असं म्हणतात. ताडी  सामन्यात : नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मिळते. एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये झाडाला ताडी येत नाही.
ताडीच्या झाडाला रात्री मडके अडकवून त्याला कोयत्याने खापे मारतात. त्यातून  थेंब थेंब गोड रस पाझरतो. त्या गोड रसास नीरा म्हनतात. ती मडक्यातून काढून हल्ली मार्केतिंगची व्यवस्था झाल्याने व प्रचार झाल्याने विकतात. ती मधुर असते. मात्र हा गोड रस जसजसे उन वाढत जाते तसे उष्नतेने आम्बू लागतो व दुधाळ रंगाची ताडी तयार होते. हे मात्र मादक पेय आहे. अर्थात हातभट्टी वगैरे इतके नाही.स्वस्तही असते. जो द्रव नीरा म्हणून विकला जातो त्याचे तपमान वाढू नये म्हणून भांडे बर्फात ठेवतात. थन्डगार नीरा अतिशय मधुर असते . जिथे त्वरित मार्केट उपलब्ध नाही तिथे ताडी बनवून विकली जाते. त्यामुळे नीरा आरोग्य दायी आहे ताडी मद्य आहे....

मुंजारु (रं) : एप्रिल महिन्यापासुन याच गोल्याना गोल नारळासारखं फळं येतात, त्याला मुंजारु म्हणतात. मे-जुन मध्ये हे मुंजारु पुर्ण पणे पाण्यानी भरतं, मग आम्ही ती मुंजारं नारळाचं शहाळं जस पितात अगदी तसं पितो व आत मधिल मलाई तर फारच गोड व चवदार असते.

पण जुन नंतर मुंजारातील आतलं पाणी नाहीस होतं व मुंजारं पिकायला लागतात. जुलै-ऑगस्ट मध्ये ही मुंजार पिकुन पडतात, मग आम्हि ती पिकून पडलेली मुंजारं शेकोटिवर भाजुन खातो. परत सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ताडगोले विकसित होण्याची प्रक्रिया सुरु होते

गोले: ताडीच्या झाडाना दोन तिन फुट लांबीचे गोले येतात. साधरणत: नोव्हेंबर महिन्यात हे गोले ताडी नावाच्या द्रवानी भरतात. या गोल्याच्या टोकाला खुप धारधार विळीनी अगदी बारीक काप निघेल असे कापावे लागते. एकदा असे कापले की साधरन पुढचे पाच तास थेंब थेंब ताडी येते. आम्ही गावाला बांबूचे गोट्टाल (मराठीत काय म्हणतात माहीत नाही) किंवा खेडयात पिण्याच्या पाण्यासाठी दुधी असते ना, ती दुधी त्या ताड गोल्याना अशा प्रकारे बांधतो की गोल्यातुन पडणारे थेंब बरोबर त्या दुधित किंवा गोट्ट्यात पडते. पण पाच तासानंतर त्या गोल्याच्या टोकावर चिकट थर साचतो व हळु हळू थेंबं पडणे बंद होते. म्हणुन दर पाच सहा तासानी झाडावर चढून भरलेले गोट्टाल काढावे लागते आणी गोल्याच्या टोकाचा बारिक  काप कापावा लागतो. एकदा काप कापले कि परत ताडीचे थेंबं जोरात पडायला सुरुवात होते. नर झाडाला एक वेळी ८-१० गोले असतात. २५-३० दिवसात काप कापुन कापुन हे गोले संपतात, पण त्याच वेळेला नविन गोले तयार होत असतात. हे प्रक्रिया मार्च पर्यंत चालते. मादी झाडाला तुलनेने दुप्पट गोले येतात.

औषधी गुणधर्म

               नीरा ही आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत गुणकारी आहे. पहाटेच्या प्रहरी नीरा प्यायल्याने पोटातील अनेक विकार कमी होतात. किडनी स्टोनसाठी तर नीरा अत्यंत गुनकारी मानली जाते. खरं तर प्रत्येक डॉक्टर रुग्णांना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात त्यापेक्षा ही 10 पट अधिकचे न्यूट्रिशन नीरा मधून मिळत असतेनारळाप्रमाणे ताडही महत्त्वाचा व उपयुक्त वृक्ष आहे. त्यातील शर्करायुक्त रस ही मुख्य उत्पन्नाची बाब आहे. फुलोरे महाछदातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांना खाचा पाडून त्याखाली बांधलेल्या मडक्यात पाझरणारा गोड रस जमा करतात. आंबवल्यावर या रसाची ताडी बनते; ती मादक पेय आहे. रसापासून गूळ व साखरही करतात. मादी–झाडापासून नर–झाडापेक्षा जवळजवळ दीडपट जास्त रसाचे उत्पादन होते. ताज्या रसाला ‘नीरा’ म्हणतात, त्यात १२ टक्के साखर असते. ताडी अनेक लोकांच्या आवडीचे उत्तेजक, स्वस्त व मादक पेय असून तीत थोडी साखर आणि ‘यीस्ट’ (किण्व) नावाची सूक्ष्म वनस्पती असते; त्यावरच ताडीचा पौष्टिकपणा अवलंबून असतो, कारण यीस्टमुळे ‘ब जटिल’ या जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो; ताडी पिणाऱ्या लोकांत या जीवनसत्त्वाच्या उणीवांचे परिणाम दिसून येण्याचा संभव कमी असणे शक्य आहे. मूळ शीतक (थंडावा देणारे) व झीज भरून काढणारे असून त्याचा रस मूत्रल (लघवी साफ करणारा), उत्तेजक, कफनाशक(कफ काढून टाकणारा) असून जलशोथात (पाणी साचून झालेल्या सूजेवर) आणि दाहक विकारात गुणकारी असतो. बियांतील गर शामक व पौष्टिक असतो. हिंदू व बौद्ध धर्मीय लोक ताडाला पूज्य मानतात.

फळामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. पूर्व जावा, इंडोनेशियामध्ये, हे बर्याचदा पारंपारिक औषधांमध्ये वापरले जाते; कळ्या विशेषतः लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून वापरली जाते. प्रयोगशाळेच्या सेटिंगमध्ये मोजले असता पाल्मिराच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म असल्याचे देखील दिसून आले आहेपालमायराचे फळ कच्चे खाल्ले जाते तर बाहेरील थर अद्याप कच्चा असतो. परिपक्व होण्यासाठी सोडल्यास, बाहेरील थर कच्चा, उकडलेला किंवा भाजून देखील खाऊ शकतो. या फळाची चव लिचीसारखीच असते आणि त्यात जेलीसारखी सुसंगतता असते. हे सहसा करी, मिष्टान्न आणि गोड नारळ पेयांमध्ये वापरले जाते. झाडाचा रस खजुराच्या “ताडी” (वाइन) मध्ये आंबवला जाऊ शकतो किंवा साखरेचे ब्लॉक्स बनवण्यासाठी उकळले जाऊ शकतात, ज्याला पाम ‘गुळ’ असेही म्हणतात. काही इंडोनेशियन बेटांवर, ही साखर स्थानिक आहारासाठी कार्बोहायड्रेट्सचा प्राथमिक स्त्रोत आहे. याव्यतिरिक्त, पाम कंद हे खाण्यायोग्य स्टार्चचे स्त्रोत आहेत जे पीठ बनवता येत.

सामान्य उपयोग

  ताडाचे खोड भरीव, आतून फिकट तपकिरी रंगाचे व मऊ असते; त्याच्या उभ्या छेदात सुंदर रेषा दिसतात. पृष्टभाग कठीण आणि 
लांब धाग्यांचा बनलेला असतो.बाहेरचे कठीण लाकूड खांब, वासे,
फळ्या इत्यादींकरिता वापरतात कारण ते मजबूत व टिकाऊ असते. 
तळभाग सुटा करून व पोखरून बादलीसारखा वापरतात. 
इतर सरळ भाग पोखरून त्यांचा पाणी वाहून नेण्यास पन्हळाप्रमाणे
 उपयोग होतो. पंखे, छपरे, चटया, छत्र्या, हॅट, होडगी, टोपल्या इत्यादींकरिता पानांचा उपयोग करतात. पूर्वी पाने 
लिहिण्याकरिता वापरीत. पानांच्या देठांपासून व मध्यशिरेपासून निघणाऱ्या राठ धाग्यांपासून झाडू, कुंचले, दोर, चुड्या इ. वस्तू 
बनविणे हा घरगुती धंदा बनला आहे.  कच्च्या बियांतील मऊ गरापासून मुरंबे वगैरे बनवितात किंवा तो तसाच खातात. 
लहान रोपटी जमिनीतून काढून भाजीप्रमाणे खातात अथवा दळून त्यांचे पीठ करतात.  बियांपासून तेल मिळते; त्या भाजूनही
 खातात.  या झाडापासून मिळणारा डिंक काळा व चमकदार असतो. भारतात, या झाडाचा उल्लेख "ताला विलासम" या 
प्रसिद्ध तमिळ कवितेमध्ये "जीवनाचे झाड" म्हणून करण्यात आला आहे, ज्यामध्ये अन्न आणि औषधापासून ते सुतारकाम
 आणि छतावरील खाज घालण्यापर्यंतचे 801 उपयोग आहेत. पालमायराचे लाकूड बांधकामात वापरले जाते आणि 
 त्याचा कोळसाही बनवता येतो. त्याची पाने टोपली विणण्यासाठी किंवा  कातडीसाठी वापरली जातात. याव्यतिरिक्त, 
त्याची भव्य उंची हे एक लोकप्रिय शोभेचे झाड बनवते. भारत, कंबोडिया आणि इंडोनेशियाच्या काही भागात 
पामीरा वृक्ष देखील सांस्कृतिक प्रतीक आहे; उदाहरणार्थ, त्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य, “महाभारत” मध्ये आहे.  
काही स्त्रोतांचा असा दावा आहे  की संस्कृत वर्णमाला शोधणार्‍याने 6,000 वर्षांपूर्वी पामीरा पामची पाने लेखन सामग्री
 म्हणून वापरली होती.  या आणि इतर असंख्य भारतीय ग्रंथ आणि म्हणींमध्ये वृक्षाचा उल्लेख असल्यामुळे त्याला जादुई किंवा 
 गूढ गुणधर्म असण्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. 
आज, हे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याचे अधिकृत वृक्ष आहे.
अशा बहु उपयोगी वनस्पती लागवड हे भविष्यात चांगले ठरू उत्पन्न देणारे ठरू शकते.

  HIGHEST FOREST PERCENTAGE STATE IN INDIA ( भारतातील सर्वाधिक वन टक्केवारी असलेले राज्य ) वनांचे जागतिक महत्व  (What is the Importance of...